राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पु. श्री. गोळवलकर गुरुजी यांच्या प्रेरणेतून सन १९५१ साली श्रीराम शिक्षण संस्थेची सुरुवात करण्यात आली.
संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा शुभारंभ इ.स. १९५१ मध्ये झाला. सुरुवातीला इयत्ता ५ ते ८ चे वर्ग सुरु करण्यात आले. श्री. मधुकरराव उर्फ (दादासाहेब) बनसोड यांनी १ जुलै १९५१ रोजी मुख्याध्यापक आणि संस्था सचिव म्हणून धुरा सांभाळली. फक्त ३४ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास, आज शिक्षणाचा दिप बनून हजारो विद्यार्थ्यांचे जीवन उजळवतो आहे.
१९५४ मध्ये इयत्ता ८ वी ते १० वी चे वर्ग सुरू करण्यास शासनाची परवानगी मिळाली.
१९५६ मध्ये विद्यार्थ्यांची आवश्यकता ओळखून श्रीराम प्राथमिक शाळेची स्थापना करण्यात आली.
महिला शिक्षणाचे महत्व लक्ष्यात घेऊन संस्थेचे कन्या विद्यालय असावे असा विषय निघाला सर्वांनी तो उचलून धरला आणि १९५९ साली "श्रीराम कन्या विद्यालय" स्थापन करण्यात आले. श्री. कृष्णराव महिराळ यांनी श्रीराम कन्या विद्यालयाचे पहिले मुख्याध्यापक म्हणून कार्यभार स्वीकारला आणि त्यांनी पुढील काही वर्षे संस्था सचिव म्हणून जवाबदारी पार पाडली.
१९६० साली "बालक मंदिर" आणि "श्रीराम सार्वजनिक वाचनालय" सुरू करण्यात आले.
आज हे वाचनालय रामटेक तालुक्यातील 'ब' ग्रेड दर्जाचे आणि तालुका वाचनालयाचा दर्जा प्राप्त असलेले एकमेव वाचनालय आहे.
१९६२ साली वाईटोला येथील पालकांच्या मागणीवरश्रीराम उच्च प्राथमिक शाळा स्थापन करण्यात आली.
आता १ ली ते ७ वी पर्यंतचे वर्ग येथे शिक्षण आणि संस्कारांची गोड संगत घडवतात.
२००४-२००५ मध्ये श्रीराम विद्यालया मध्ये श्रीराम कनिष्ठ महाविद्यालय विना अनुदान तत्वावर सुरु करण्यात आले व त्यात विज्ञान व कला अश्या ०२ शाखा सुरु करण्यात आल्या.
त्यानंतर २००५-०६ मध्ये "ताई गोळवलकर महाविद्यालय" विना अनुदान तत्वावर सुरू करण्यात आले.
२०१३-१४ मध्ये या महाविद्यालयाला तालुक्यातील एकमेव महाविद्यालय या तत्वावर त्यास अनुदान मिळाले.
सध्या येथे CBZ PCM Computer Science Home Science Fashion Designing असे इत्यादी अभ्यासक्रम सुरु आहेत.
२०२२ पासून M.Sc. Chemistry आणि Zoology हे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहेत.
या सोबतच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असे विविध अभ्यासक्रम यशस्वीरीत्या चालवले जातात.
२०२२ मध्ये पहिली NAAC मानांकन प्रक्रिया करण्यात आली त्यात महाविद्यालयाला 'B' (२.४५) ग्रेड मिळाला.
२०२३-२४ मध्ये MSME चे Incubation Centre मिळाले.
२०२५ मध्ये "परम स्किल सेंटर" सुरु करण्यात आले आहे.